धक्कादायक : वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना...
कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अहिल्यानगर – लोक वारकरी संप्रदायाकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहतात. त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात परंतु अहिल्यानगर जिल्ह्यात वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय 38) याने एका अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून अत्याचार केला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता अटक केली असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या नराधमाला 20 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.