बिंदू चौकातील मस्जिद परिसरात गॅस गळतीमुळे आग...
कोल्हापूर – आज सकाळच्या दरम्यान बिंदू चौकातील बडी मस्जिद परिसरात गॅस गळतीमुळे आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.