कोल्हापूरात सरकारी नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

<p>कोल्हापूरात सरकारी नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा</p>

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४२ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. याबाबत संजय वंसतराव सनगर (वय ५६, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र मनोहर पाटील (रा. महादेव नगर, फुलेवाडी रिंग रोड) व राजू दत्तात्रय सरनाईक (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) यांनी फिर्यादीच्या मुलासह ओळखीच्या काही लोकांना आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी विश्वास संपादन करून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. त्यानंतर बनावट सरकारी नियुक्ती आदेश देऊन संबंधितांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. हा प्रकार ७ एप्रिल २०१४ पासून फुलेवाडी परिसरात घडत असल्याचे समोर आलंय.

या प्रकरणात एकूण ४२ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटलंय. याप्रकरणी दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद झालाय. अधिक तपास पोलिस करतायत.