मणेर मळ्यात रिक्षा चालकाचा खून... डोक्याचा केला चेंदामेंदा
कोल्हापूर – काल रात्रीच्या सुमारास उचगावातील मणेर मळा येथे रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही सर्व घटना सकाळी उघडकीस आली आहे.
प्रशांत बाबूराव पंडित (वय ४०) असे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रशांत हा रिक्षा चालवत होता. मणेर मळा रिक्षा स्टॉपचा तो माजी अध्यक्ष होता. यादववाडी येथील हनुमान मित्रमंडळाच्या खोलीमागे त्याचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या खुनाची नोंद गांधीनगर पोलिसात झाली असून पोलिसांनी श्वानपथक बोलावून तपास सुरु केला आहे.