शाहुपुरी पोलिसांकडून चोरीच्या ५ मोटारसायकली जप्त; दोन आरोपी ताब्यात

<p>शाहुपुरी पोलिसांकडून चोरीच्या ५ मोटारसायकली जप्त; दोन आरोपी ताब्यात</p>

कोल्हापूर : शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी योगेश बाळासो नायकवाडी (वय ४०, रा. माळी कॉलनी, सरनोबतवाडी ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ मार्च २०२६ रोजी स्टेशन रोड येथील बहिरशेट ऑटो लाईन, अनंत कॉम्प्लेक्ससमोरील दुकानासमोर विक्रीसाठी लावलेली ४० हजार रुपये किंमतीची हिरो सुपर स्प्लेंडर (एमएच ०९ जीएन ५७२९) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विजय आनंदा जाधव (वय ४०) व रेश्मा सुभाष सातपुते (वय ३२, रा. बोरवडे, ता. कागल) यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपींकडून हिरो सुपर स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर प्लसच्या दोन मोटारसायकली, होंडा शाईन तसेच अॅक्टिवा मोपेड असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके व आकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार, पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, सुशिलकुमार गायकवाड, गौरव शिंदे, सचिन पांगे, सचिन सातपुते, रवि पाटील आणि अभिजीत दाभाडे यांनी केली.