कोल्हापुरातील मातंग वसाहत येथे रंगपंचमी दिवशी खून; सख्ख्या भावाकडून लहान भावाचा खून
कोल्हापूरातील राजारामपुरी मातंग वसाहत येथे रंगपंचमीच्या दिवशी धक्कादायक खुनाची घटना घडलीय. सख्ख्या भावाकडून लहान भावाची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय.हर्ष पांढरबळे असे मृत युवकाचे नाव असून यश पांढरबळे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हर्ष पांढरबळे याच्या खुनात झाले.घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालंय. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत.