धावत्या कारवर गव्याने घेतली उडी अन् थरकाप उडाला... 

खिंडी व्हरवडे - आकनुर मार्गावरचा प्रकार 

<p>धावत्या कारवर गव्याने घेतली उडी अन् थरकाप उडाला... </p>

कोल्हापूर - मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास खिंडी व्हरवडे - आकनुर मार्गावर खिंडीचा माळ परिसरात धावत्या कारच्या बॉनेटवर गव्याने उडी मारल्याने कार चालकासह सर्वांचा थरकाप उडाला.
सुदैवाने कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. पण रात्रीच्या अंधारात चालत्या गाडीवर अचानक  गव्याचे धूड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे
 चक्रेश्वरवाडी येथील बांधकाम व्यावसायिक तरुण स्वप्निल शिवाजी भांदिगरे हे आपले बंधू राजेंद्र यांच्यासोबत गुडाळला मित्राकडे जेवायला गेले होते. रात्री गावी परत येत असताना परतीच्या मार्गावर खिंडीचा माळ येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उंच बांधावरून गव्याने थेट स्विफ्ट कारच्या बॉनेटवर उडी घेतली. गव्याचे धूड कारवर कोसळल्याने बॉनेट चेपले असून दर्शनी काच फुटली आहे. चार महिन्यापुर्वीच भांदिगरे यांनी ही नवी कार खरेदी केली होती. वन विभागाने या दुर्घटनेचा पंचनामा करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चक्रेश्वरवाडीचे सरपंच सदाशिव भांदिगरे यांनी प्रादेशिक वनविभागाकडे केली आहे.