यड्रावमधील दूध प्रक्रिया प्रकल्पातील बगॅसच्या साठ्याला भीषण आग... 

लाखों रूपयांचे नुकसान

<p>यड्रावमधील दूध प्रक्रिया प्रकल्पातील बगॅसच्या साठ्याला भीषण आग... </p>

इचलकरंजी - यड्राव मधल्या पार्वती औदयोगिक वसाहतीमध्ये दुधावर प्रक्रिया करणारा हॅपी पाश्चस हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील बगॅसच्या साठ्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगी मध्ये बॉयलरच्या इंधनासाठी साठवलेले पाल्याचे गठ्ठे आणि बगॅसला आग लागून अल्पावधीतच आगीने रौद्र रुप धारण केले. आगीची तीव्रता लक्षात घेता इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड आणि हातकणंगलेतील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबांच्या मदतीने दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत बॉयलरसाठी साठवून ठेवलेले ऊसाचे पाचट, बगॅस, इतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.