बालिंगा हद्दीत टेंपो अन् तीन दुचाकींचा अपघात...
कोल्हापूर – बालिंगा हद्दीत एका टेंपोचा आणि तीन दुचाकींचा अपघात झाला आहे. कोल्हापूरहून आमशीकडे दुधाचा टेंपो जात असताना बालिंगा हद्दीत टेंपोचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्यालगत लावण्यात आलेल्या तीन दुचाकींना धडक देत समर्थ स्वीटसमोर असणाऱ्या झाडावर आदळली. यामध्ये टेपो आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
चालकाच्या सतर्कतेमुळे कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही घटना समजताच करवीर पोलीस ठाण्याचे सुमित पोवार हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी तात्काळ दाखल झाले होते.