धक्कादायक : 40 वर्षाच्या इसमाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...कोल्हापुरातून संताप
कोल्हापूर - तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने 40 वर्षाच्या शशिकांत घाटगे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरातून संताप व्यक्त होत आहे.
शशिकांत घाटगे याने त्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले आहे. तंबाखूची पुडी आणण्याचा बहाणा करून मुलीला बाथरूममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिसात करण्यात आली आहे. सध्या या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.