मुरगूड - निपाणी मार्गावरील सुरूपलीजवळ भडगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू...
अपघात की घातपात याबद्दल संभ्रम
कोल्हापूर - कागल तालुक्यातील भडगावमधील सागर मोरे हे निपाणी मधील एका हॉटेलमध्ये काम करत होते. बुधवारी रात्री उशिरा ते दुचाकीवरुन सुरूपली मार्गे भडगावकडे चालले होते. मुरगूड - निपाणी मार्गावरील सुरूपली कुरुकली दरम्यान म्हसोबा मंदिराजवळ ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. प्रथमदर्शनी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हा घातापाताचा प्रकार असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.