कुंभोज–हातकणंगले मार्गावर भीषण अपघात; दुधगावच्या युवकाचा ५० फूट उडून जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
सांगली जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुधगाव येथील एका युवकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
कुंभोज – हातकणंगले मार्गावर लक्ष्मी मंदिर जवळ हा थरारक अपघात घडला.दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने युवक सुमारे ५० फूट उडाल्याचे सांगितले जात आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. अधिक तपास पोलीस करत आहेत.