चैन्नईच्या गोल्डन बीचवर 15 फुटांच्या लाटा उसळल्या... महाराष्ट्रातील विद्यार्थी बुडाले 

<p>चैन्नईच्या गोल्डन बीचवर 15 फुटांच्या लाटा उसळल्या... महाराष्ट्रातील विद्यार्थी बुडाले </p>

नवी दिल्ली – चैन्नईतील गोल्डन बीचवर अचानक 15 फुटांच्या लाटा उसळल्या. या लाटांमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी बुडाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 
यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्थानिक तसेच बचाव पथकांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले आहे. चैन्नई येथे महाराष्ट्रातील 15 मुले Cognizant  या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी होती. काल सुट्टी असल्याने ही सर्व मुले चेन्नई इथल्या बीचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली.  मुलांचा सर्व ग्रुप सेल्फी घेत असताना मोठ्या लाटेचा शिकार ठरला आहे. काही मुले समुद्रात वाहून गेली आहेत.  काही मृतदेह सापडले आहेत. त्यात 3 मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.