लाच घेताना रंगेहात सापडलेल्या मंत्रालयातील लिपिकाला जामीन मंजूर
मुंबई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लिपिक राजू ढेरिंगे हा लाच घेताना रंगेहात सापडला होता. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने लाच घेतलेल्या राजू ढेरिंगे याचा जामीन मंजूर केला आहे.