अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी उदयभान रामबहाल यादवला ५ दिवसांची पोलीस कोठडी...
कोल्हापूर – शहरातील फुलेवाडी येथील उदयभान रामबहाल यादव याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. या प्रकरणी आज न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुळचा उत्तर प्रदेशचा पण सध्या कोल्हापुरातील फुलेवाडी येथे राहणारा संशयित आरोपी उदयभान रामबहाल यादव याची पिडीत अल्पवयीन मुलीबरोबर ओळख झाली. त्याने पिडीत मुलीला फुस लावुन, प्रेमाच्या जाळयात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. मुलीमध्ये शारीरिक बदल झाल्याच तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईने डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. डॉक्टर तपासणी नंतर पिडीता गरोदर असल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेवून आईने विचारणा केली असता तिने याबाबतची सविस्तर माहिती आईला दिली.
त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उदयभान रामबहाल यादव याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.