चौकुळ गावातील महिला आठ दिवसांपासून बेपत्ता; शोधमोहीम सुरू
चंदगड-कोवाड परिसरात असल्याची शक्यता
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-चौकुळ परिसरातील चौकुळ गावडेवाडी येथील भागीरथी बाबुराव गावडे या महिला गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आपल्या राहत्या घरातून रात्री कोणालाही न सांगता निघून गेल्यापासून कुटुंबीय व ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागीरथी गावडे या चंदगड-कोवाड परिसरात आढळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा निश्चित झालेला नाही. त्यामुळे नातेवाईक व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित महिला कोणाला आढळल्यास किंवा कोणाकडेही त्यांच्याबाबत माहिती असल्यास खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिलीप गावडे – 9403596676
सुहास गावडे – 9403596686
रवी गावडे (पोलीस पाटील) – 7822074280
या घटनेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर त्या सुरक्षितपणे परताव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.