घटस्फोटीत पत्नीला घाबरवण्यासाठी केली भानामती... 

 पतीला कोडोली पोलिसांनी केली अटक

<p>घटस्फोटीत पत्नीला घाबरवण्यासाठी केली भानामती... </p>

कोल्हापूर -  पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत राहणाऱ्या सागर जेऊरकर आणि कोमल दरबारे यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून कोमल या कोडोलीतच आई - वडिलांकडे राहत आहे. १४ फेब्रुवारीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्हॅलेंटाईन डे दिवशी एका झाडावर बाहुलीला तरुणीचा फोटो काळ्या रंगाच्या दोऱ्याने बांधल्याचा प्रकार उघडकीला आला होता. त्या फोटोवर हळदी-कुंकू वाहून खिळे ठोकण्यात आले होते.

 या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी या प्रकाराची माहिती कोडोली पोलिसांना दिली होती. पोलीसांनी माहिती घेतली असता झाडावरील बाहुलीला कोमल यांचा फोटो बांधल्याचे आढळून आले आहे. कोमल यांना हा प्रकार समजताच त्या घाबरल्या. अखेर त्यांनी या प्रकाराबद्दल सागर जेऊरकरवर संशय व्यक्त करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन कोडोली पोलीसांनी सागर जेरकरला अटक केली आहे.