तारदाळात दरोडा… दोन लाखांचा ऐवज लंपास
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील तारदाळमध्ये काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाराला दरोडा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तारदाळातील कुलकर्णी मळ्यात विठ्ठल गायकवाड आणि त्यांची पत्नी उज्ज्वला गायकवाड गेल्या कित्येक वर्षा पासून राहत आहेत. सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाराला दरोडेखोर दरवाजा तोडून त्यांच्या घरात शिरले. दरोडेखोरांच्या टोळीने घरातील साहित्य अस्ताव्यस्तपणे फेकले आणि उज्ज्वला यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र, कानातील रिंगा, चांदीचे पैंजण आणि लोखंडी पेटीतील २५ हजारांची रोकड लंपास केली आहे. चोरी केल्यानंतर त्यांनी गायकवाड दाम्पत्याला घरात कोंडून ठेवले होते. गायकवाड यांनी यााबाबत शहापूर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.