इचलकरंजीत एका परप्रांतीयाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या...

<p>इचलकरंजीत एका परप्रांतीयाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या...</p>

इचलकरंजी - शहरातील शहापूर येथील कृष्णा नगर सोलगेब मळा परिसरात एका परप्रांतीयाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी शेतात जात असताना काही नागरिकांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती नागरिकांनी शहापूर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करून पंचनामा केला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. 
काल रात्री काही मित्र शेतामध्ये नशा करत बसले होते त्यातून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत युवकाच्या डोक्यात दगड घातला असावा, अशी  प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्या मृत  युवकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती.