आमशी, केकतवाडी, वाघोबावाडी ग्रामस्थांमध्ये मोठा राडा...

<p>आमशी, केकतवाडी, वाघोबावाडी ग्रामस्थांमध्ये मोठा राडा...</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील आमशी गावातील सातेरी महादेव मंदिराचा ताबा मिळण्याच्या कारणास्तव आमशी, केकतवाडी, वाघोबावाडी ग्रामस्थांमध्ये मोठा राडा झाला आहे. पोलीसांनी वेळीच हस्तपेक्ष केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या झालेल्या गोंधळामुळे करवीर पोलीसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. 
कोल्हापुरातील पांडवकालीन मंदिर म्हणून सातेरी महादेव मंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिराचा ताबा मिळवण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये वाद सुरु आहे हा वाद आज महाशिवरात्र निमित्त एकत्र आलेल्या ग्रामस्थांमुळे समोर आला आहे.