इचलकरंजीतील अपघातात एकाचा मृत्यू ; एक जण जखमी
इचलकरंजी - सांगली जिल्ह्यातील डिग्रज मधील दोन युवक हुपरीतील जत्रेसाठी जात होते. यावेळी इचलकरंजी - कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या लक्ष्मी इंडस्ट्रीज फाटा येथे समोरुन येणाऱ्या टेम्पो आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सांगली जिल्ह्यातील डिग्रजमधील नागेश मलमे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहकारी अजय सायमते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनास्थळावरुन टेम्पोचालकाने पळ काढला आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि मित्र परिवारांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.