पन्हाळ्यात धक्कादायक घटना : वॉचमनकडून पत्नीचा दगडाने ठेचून खून

<p>पन्हाळ्यात धक्कादायक घटना : वॉचमनकडून पत्नीचा दगडाने ठेचून खून</p>

पन्हाळा- पन्हाळागडावरील चंदवानी यांच्या बंगल्यात एक धक्कादायक घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. बंगल्यात वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या रमेश धडेल याने आपल्या पत्नी कांचन धडेल हिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी रमेश धडेल मानसिक अस्वस्थ अवस्थेत असल्याचीही माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. आरोपी रमेश धडेल याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.