गाझियाबादमध्ये एकाच घरातील तिन्ही सख्या बहिणींची आत्महत्या...
ऑनलाईन गेमने केला घात
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादमध्ये एकाच घरातील तिन्ही सख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ऑनलाईन टास्क बेस्ड गेमच्या विळख्यातून ही आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज (बुधवारी) पहाटे गाझियाबाद मधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन बहिणींनी एकामागोमाग उड्या घेत आत्महत्या केली आहे. मृत बहिणींचे वय १२, १४ आणि १६ वर्ष आहे.
पहाटे २ वाजता स्थानिकांना इमारतीवरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला. यावेळी तीनही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. स्थानिकांनी मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. पोलिसांना घरात सुसाईड नोट आढळली आहे. ज्यात हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून हिंदी, इंग्रजीमध्ये मजकूर लिहून ठेवला आहे. मम्मी-पप्पा आम्हाला माफ करा, असे लिहून रडतानाचा एक इमोजी या सुसाईड नोटवर काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.