कसबा बावड्यातील ओम गणेश कॉलनीत चोरी... साठ हजारांचा ऐवज लंपास

<p>कसबा बावड्यातील ओम गणेश कॉलनीत चोरी... साठ हजारांचा ऐवज लंपास</p>

कोल्हापूर - कसबा बावडा येथील ओम गणेश कॉलनी परिसरातल्या सुजाता कोथळे यांच्या घरी विकी याकूब बुचडे हे गेल्या सहा महिन्यांपासून कुटुंबियांसमवेत भाड्याने राहतात. शनिवारी रात्री बुचडे हे तळ मजल्यावरील खोलीला कुलूप लावून तिसऱ्या मजल्यावर कुटुंबियांसमवेत झोपले होते. यावेळी अज्ञाताने बुचडे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.

 चोरट्याने बुचडे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सुमारे साठ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे. आज सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी बुचडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.