शिंगणापूर यात्रेला आलेला युवक नदीत बुडाला
कोल्हापूर - शिंगणापूर गावातील विशालतीर्थ यात्रेनिमित्त देवदर्शन आणि स्नानासाठी आलेला कोल्हापुरातील एक युवक नदीत बुडाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आली. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील हा युवक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या युवकासोबत पोहायला आलेल्यांनी त्याला बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.