दऱ्याचे वडगाव येथील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार... दोघे रंगेहाथ सापडले
कोल्हापूर – जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. परंतु हा प्रकार करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पडकले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पकडण्यात आलेल्या दोघांमध्ये एका तृतीयपंथीयाचा समावेश असून अन्य तीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
स्मशानभूमीत गुलाल, टाचणी टोचलेली लिंबू, काही छायाचित्रे तसेच अन्य पूजेचे साहित्य ठेवून पूजा सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित दोघांना पकडले. ही घटना गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी घडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.