कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राडा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

निकालानंतर राडा करणं पडलं महागात !

<p>कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राडा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल</p>

कोल्हापूर महानगरपालिकेचा निवडणूक निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मधून माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेले त्यांचे नातेवाईक शिवतेज खराडे यांचा पराभव केलाय. दरम्यान दुपारी बोंद्रे यांची विजय मिरवणूक काढत असताना बोंद्रे आणि खराडे समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं. तर माजी महापौर सई खराडे यांच्यासह केतन जाधव, अभिमन्यू पाटील, रोहित खराडे हे किरकोळ जखमी झालेत. याप्रकरणी रोहित खराडे यांच्या फिर्यादीवरून अजित दळवी, उत्तम तिबिले, पृथ्वीराज सरनाईक, सत्यजित दळवी, आदित्य दळवी,, निलेश तीबिले, दिगंबर तीबिले यांच्यासह अन्य ५० जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तर दुसरीकडं निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर शहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्या टाकळा परिसरातील कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी देवकुळे यांच्या फिर्यादीवरून ओम खांडेकर, कुमार भोसले, करण मुडढुंगे यांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.