५३ व्या सरन्‍यायाधीशांनी घेतली शपथ..! 

<p>५३ व्या सरन्‍यायाधीशांनी घेतली शपथ..! </p>

नवी दिल्ली – रविवार, २३ नोव्हेंबर रोजी विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचा कार्यकाळ संपला. यानंतर आज सूर्य कांत यांनी ५३ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
देशाचे ५३ वे सरन्‍यायाधीश ठरलेल्या सूर्य कांत यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असणार आहे. शपथविधीनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती भवनात उपस्थित असलेल्या इतरांची भेट घेतली. तसेच माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना आलिंगन दिले.