भूषण गवई यांच्यावरील हल्ला न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर प्रहार-आमदार सतेज पाटील

<p>भूषण गवई यांच्यावरील हल्ला न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर प्रहार-आमदार सतेज पाटील</p>

कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेच्या पावित्र्यावर थेट प्रहार आहे या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी न्यायमूर्ती गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनीही ट्विट करुन या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. आमदार पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विकृत विचारसरणी आणि अतिरेकी प्रवृत्तीमुळे प्रेरित अशा हिंसक कृतींना सभ्य समाजात स्थान नाही. गवई यांच्यावरील हल्ला हा न्यायव्यवस्थेच्या पवित्रतेवर थेट प्रहार आहे. सर्वांनी या झुंडशाही मानसिकतेचा तीव्र निषेध केला पाहिजे. न्यायसंस्था तसेच कायद्याच्या राज्याच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहिले पाहिजे.