उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून राधाकृष्णन तर विरोधकांकडून रेड्डी रिंगणात

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी अशी लढत रिंगणात पहायला मिळणार आहे.