सर्किट बेंचच्या उ‌द्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी...

<p>सर्किट बेंचच्या उ‌द्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी...</p>

कोल्हापूर - कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकारांसह विविध पक्ष, संघटना गेली ४० वर्ष कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी लढा देत होते. अखेर एक ऑगस्ट रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत सोमवारी १८ ऑगस्ट पासून सर्किट बेंच सुरू होणार आहे.

सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळ्याला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. रविवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जुन्या न्यायालयाच्या इमारतीत उद्घाटन झाल्यानंतर मान्यवर मेरी वेदर ग्राउंड येथे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सहा जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायाधीश, वकील, पक्षकार, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी असे पाच हजारांहून अधिक लोक या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेरी वेदर ग्राउंड परिसरात सध्या प्रशासनाकडून भव्य मंडप उभारणीचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या जुन्या इमारतीतही दुरुस्ती, रंगकाम तसंच प्रलंबित असलेले बांधकाम आणि अन्य कामे युद्ध पातळीवर सुरू आहे.