NCERT ने सुप्रीम कोर्टात मागितली माफी... 

संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचा घेतला निर्णय

<p>NCERT ने सुप्रीम कोर्टात मागितली माफी... </p>

नवी दिल्ली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्या प्रकरणी वाद निर्माण झाला आहे. यावर सुप्रीम कोर्टाने NCERT ला चांगलच फटकारले आहे. यावर NCERT ने कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.  

शालेय स्तरावर न्यायपालिकेबद्दल “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतली आणि तीव्र नाराजी व्यक्त करत NCERT कडून स्पष्टीकरण मागितले.
 नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. मात्र त्यामधील काही मजकूर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याची कबुली देत NCERT ने खेद व्यक्त केला आहे.