दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल, सिसोदियांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता
नवी दिल्ली - दिल्लीतील दारू धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह २३ जणांविरोधात न्यायालयात लढा सुरु होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या प्रकरणाचा आज अंतिम निकाला जाहीर झाला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह २३ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद... केजरीवाल कट्टर इमानदार, मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. आम आदमी पार्टी कट्टर इमानदार आहे. सत्याचा विजय झाला, असे त्यांनी म्हटले आहे.