लोकशाहीत घराणेशाही हा एक मोठा गुन्हा : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली – लोकशाही व्यवस्थेत घराणेशाही आणि स्वार्थ हा एक मोठा गुन्हा आहे. ज्यावेळी सरकारी सेवेतील लोकांकडून घराणेशाही होते त्यावेळी तर तो जास्तच मोठा गुन्हा ठरतो, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील एका हाऊसिंग सोसायटीच्या याचिकेवर युक्तिवाद करताना केले आहे.
जस्टिस संजय कुमार आणि के विनोद चंद्रन यांच्या बेंचनं आपल्या निर्णयावेळी सांगितलं की, 'गव्हर्निंग बॉडीने आपल्या सदस्यांना आणि आपल्या कर्मचाऱ्यांना फायदा पोहचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. यावर कोर्टाने, परिवारवाद आणि स्वार्थ ही लोकशाही व्यवस्थेला असलेला एक शाप असल्याचा संताप व्यक्त केला आहे.