‘या’ राज्याच्या मुख्यमंत्री वकिलाच्या भूमिकेत... 

विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात केला युक्तिवाद  

<p>‘या’ राज्याच्या मुख्यमंत्री वकिलाच्या भूमिकेत... </p>

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या  निवडणूक आयोगाच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) प्रक्रियेला आव्हान
देणाऱ्या याचिकेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात स्वता: युक्तिवाद केला आहे.  त्या एक प्रशिक्षित वकील असल्याने आज त्या वकिलाच्या भूमिकेत दिसल्या. त्यामुळे  मुख्यमंत्री पदावर असताना याचिका लढवणाऱ्या पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री त्या ठरल्या आहेत. 

निवडणूक आयोगाने 24 जून 2025 आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेले SIR संबंधित सर्व आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2026 ची विधानसभा निवडणूक सुधारित यादीऐवजी सध्याच्या 2025 च्या मतदार यादीनुसारच घ्यावी, असा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आग्रह आहे. यावर युक्तिवाद करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, निवडणूक आयोग हा एक व्हाट्सअॅप आयोग असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोग कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे म्हणत त्यांनी आयोगाच्या वकिलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगालला निवडणूक आयोग लक्ष करत आहे आसामला का नाही करत, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. यावरील सुनावणी पुन्हा सोमवारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.