तब्बल आठ वर्षांनी उद्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नांवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी 

<p>तब्बल आठ वर्षांनी उद्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नांवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी </p>

 बेळगाव – तब्बल आठ वर्षांनी उद्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सीमावासीयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने दावा मेन्शन करण्यात आला होता. वरिष्ठ विधिज्ज्ञ ॲड. सी. एस. वैद्यनाथन आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी ही विनंती मान्य करून उद्या बुधवारी सुनावणी निश्चित केली आहे. या दिवशी मूळ दाव्यावरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.