कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघावर प्रशासक नेमावा- कोल्हापूर जिल्हा मजूर संस्थांची मागणी

<p><strong>कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघावर प्रशासक नेमावा- कोल्हापूर जिल्हा मजूर संस्थांची मागणी</strong></p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघावर प्रशासक नेमावा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मजूर संस्थांनी केलीय. मागणीचे निवेदन आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देण्यात आलंय.

निवेदनात असं म्हटलंय कि, कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ, कोल्हापूर ही एक शिखर संस्था असून आम्ही या संस्थेचे विधिवत सभासद आहोत. या संस्थेचे सध्याचे चेअरमन यांनी मागील काही काळात संचालक मंडळास कोणतीही माहिती किंवा विश्वासात न घेता मनमानीपणे व बेकायदेशीररीत्या कामकाज चालवले आहे. यामध्ये संस्थेच्या निधीचा व संपाच्या रकमेचा गैरवापर, बेकायदेशीर संचालक नेमणूक व नियमबाह्य निर्णय घेणे असे गंभीर प्रकार घडले आहेत.

➡️ संचालक मंडळातील १५ पैकी १० संचालकांनी राजीनामे सादर केले आहेत.

➡️ संस्थेच्या कामकाजाबाबत आधीच आपल्यामार्फत एक संदर्भीय नोटीस देण्यात आलेली असून, त्यावर संस्थेने सादर केलेला खुलासा समाधानकारक नसून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदींना विरोध करणारे कारभार स्पष्टपणे आढळून येतो.

➡️ बेकायदेशीर संचालक नेमणूक करून त्यांना कार्योत्तर मंजुरी देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे.

➡️ या प्रकारामुळे संस्थेचे हित धोक्यात आले असून, संस्थेच्या निधीचा गैरवापर होत आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता, संस्थेचे सध्याचे संचालक मंडळ रीतसरपणे अकार्यक्षम व अवैध स्वरूपाचे ठरत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ, कोल्हापूर या संस्थेचे सध्याचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करण्यात यावे. संस्थेवर प्रशासक अथवा प्राधिकृत अधिकारी नियुक्त करून, संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व उपविधींच्या तरतुदीनुसार सुरळीतपणे व पारदर्शकतेने चालविण्यात यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मजूर संस्थांनी  निवेदनातून केलीय. मागणीचे निवेदन आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देण्यात आलंय.