मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्यावतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून जमलेल्या निधीचा वापर गरजू लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्य खरेदीसाठी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या योगदानातून साखर, तेल, रवा, पिठ्ठी, डाळी, कडधान्य, साबण, ब्लॉकेट, रजई या जीवनावश्यक वस्तू तसंच वही, पेन, स्कूल बॅग यासारखे शालेय साहित्य एकत्र करून १,००० पॅकेटस् तयार करण्यात आली ही सर्व मदतसामुग्री वैदयकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, चेअरमन नविद मुश्रीफ, सर्व संचालक, कामगार संघटनाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तभागाकडे पाठवण्यात आली. यावेळी नामदार हसन मुश्रीफ संघाचे कर्मचारी आणि संघटनेचा हा मदतीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ संघटनेचे जनरल सेक्रेटरी सदाशिव निकम, के. डी.सी.सी बँकेचे संचालक राजेश पाटील, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, यांच्यासह सर्व संचालक आयटकचे राज्याचे सदस्य कॉ. दिलीप पोवार, आयटकचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. एस. बी. पाटील, आयटकचे जिल्हा कमिटी सेक्रेटरी कॉ. रघुनाथ कांबळे, अध्यक्ष कॉ. मल्हार पाटील, व्ही.डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, संभाजी शेलार, संदेश पाटील, लक्ष्मण आढाव, योगेश चौगुले, कृष्णा चौगुले संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.