राजाराम साखर कारखान्याच्या कामगारांमध्ये असंतोष...

300 हून अधिक कामगारांना प्रशासनाकडून ब्रेक... 

<p>राजाराम साखर कारखान्याच्या कामगारांमध्ये असंतोष...</p>

कोल्हापूर -  कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 300 हून अधिक कामगारांना आज कारखाना प्रशासनाकडून ब्रेक देण्यात आला आहे. अचानक ब्रेक दिल्यामुळे कामगारातून असंतोष निर्माण झाला आहे.
 कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा सन 2025_26 मधील गळीत हंगाम  न झाल्याने कारखाना प्रशासनावर आर्थिक बोजा पडत असल्याचे कारण देत. कारखान्याच्या 300 हून अधिक कायमस्वरूपी कामगारांना आजपासून कामावरून काढण्यात आले आहे. या घटनेची कोणतीही पूर्व कल्पना न देता  कामगारांना आजपासून कामावर न येण्याच्या सूचना सुरक्षारक्षकाकडून देण्यात आल्याने  कामगारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी  कामगारांनी  गेटवर थांबूनच प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचा पवित्रा घेतला परंतु  प्रशासनाच्या कोणत्याही व्यक्तीने  कामगारांची  भेट घेतली नाही. चेअरमन व संचालक मंडळ आमच्याकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी कामगार संघटनेने केला आहे.