माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा...आमदारकी वाचली

<p>माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा...आमदारकी वाचली</p>

नवी दिल्ली – नाशिक न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेविरोधात आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली  होती. यावर आज सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीमुळे आमदार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे.  त्यामुळे त्यांना   मोठा दिलासा मिळाला आहे.
आ. माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला  सुप्रीम कोर्टाने  स्थगिती दिली  आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करत राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे.