अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी भादोलेच्या तरुणाला अटक
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या ओंकार मदने या युवकाने एका अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संशयित ओमकार प्रकाश मदने याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या ओंकार मदने या युवकाने एका अल्पवयीन मुलीला पैशाचे अमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याची वाच्यता कुठंही करू नको अन्यथा, जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही त्याने दिली होती. ही घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान घडली आहे. पीडित मुलीची परिस्थिती गरीब असल्याने या घटनेला लवकर वाचा फुटली नव्हती. पण पीडीतेला त्रास होऊ लागल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार ओंकार मदने याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.