जिल्ह्यातील नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मत मोजणीला सुरुवात...

<p>जिल्ह्यातील नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मत मोजणीला सुरुवात...</p>

कोल्हापूर -  आज कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि 3 नगरपरिषदेच्या निवडणुकींच्या निकालाला सकाळपासून सुरुवात झाली आहे.  २६३ जागांसाठी हा निकाल लागत आहे. यासाठी ८०९ सदस्य  आणि ५६ नगराध्यक्ष  असे एकूण ८६५ सदस्य  नशीब आजमावत आहेत.
दोन डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान जयसिंगपूर नगरपरिषदेत ४९ हजार ७४७ तर सर्वात कमी मतदान पन्हाळा  नगरपरिषदेत  3 हजार १२८ झाल्याची नोंद झाली आहे. त्यानुसार सकाळपासून निकाल यायला सुरुवात झाली आहे. 
कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले नगरपंचायतमधून काँग्रेसने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून काँग्रेसचे निहाल सनदी तर  प्रभाग क्रमांक 7 मधून  काँग्रेसचे अमर वरुटे विजयी झाले आहेत.

मलकापूर नगरपालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी पाच उमेदवार विजयी झाले आहेत. 

मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी जनसुराज्य - भाजपच्या रश्मी कोठावळे विजयी 

पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री प्रकाश पवार विजयी... नगरसेवकपदाचे विजयी संख्याबळ - 
जनसुराज्य मित्र पक्ष आघाडी - 16 (6 बिनविरोध ) अपक्ष - 04
 
मुरगूड नगरपरिषदेत मंडलिक - पाटील गटाचे १६ उमेदवार विजयी तर राष्ट्रवादी - घाटगे गटाचे चार उमेदवार विजयी... मुरगूड नगरपालिका निवडणूकीत मंत्री हसन मुश्रीफ - राजे गटाला धक्का... शिंदेसेना - भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुहासिनी प्रवीणसिंह पाटील आणि नगरसेवक पदाचे 16 उमेदवार विजयी... मुश्रीफ - राजे गटाला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत.

शिरोळ नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक चारमध्ये अपक्ष उमेदवार श्वेता संतोष जाधव विजयी...जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने  यांच्या सुनबाई भाजप - ताराराणी आघाडीच्या उमेदवार सारिकाअरविंद माने पराभूत...तर आमदार पुत्र नगरसेवक पदाचे उमेदवार अरविंद अशोकराव माने हेही पराभूत...


हातकणंगले नगरपंचायत - प्रभाग एक मधून अपक्ष उमेदवार  रोहिणी गुरुदास खोत  विजयी
प्रभाग दोन मधून  काँग्रेसच्या सुप्रिया अभिजीत इंगवले विजयी...

प्रभाग तीन मधून अपक्षचे सुभाष बाळू गोरे विजयी 

प्रभाग क्रमांक चार मधून काँग्रेसचे  गिरीश अरविंद इंगवले विजय

प्रभाग क्रमांक पाच मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश प्रसाद पाटील  विजयी

प्रभाग क्रमांक सहा मधून काँग्रेसचे निहाल इकबाल सनदी विजयी

प्रभाग क्रमांक सात मधून काँग्रेसचे अमर बाळासो वरुटे विजयी

प्रभाग क्रमांक आठ मधून अपक्षचे सुजाता रावसाहेब कारंडे विजयी

नगराध्यक्ष पदाचे शिंदे गटाचे उमेदवार अजित पाटील विजयी 

नगरसेवक पदाचे विजयी संख्याबळ -शिंदे सेना - 6
 काँग्रेस - 5
 अपक्ष - 3
 ठाकरे सेना -1
 भाजपा - 2

आजरा नगरपंचायत निकाल -  
नगराध्यक्ष पदी अशोक चराटी (ताराराणी आघाडी) विजयी...  नगरसेवक पदी - ताराराणी आघाडी  आठ उमेदवार, महाविकास आघाडीचे सहा उमेदवार  
अन्याय निवारण समितीचे दोन उमेदवार,  राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे एक उमेदवार विजयी झाले आहेत. 

चंदगड - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी... 
नगरसेवक पदाच्या 8 जागांवर भाजप, 8  जागांवर -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व मित्रपक्ष यांची राजर्षी शाहू विकास आघाडी तर एका जागेवर अपक्ष विजयी...

कागल नगरपालिका - राष्ट्रवादी अजित पवार गट - छत्रपती शाहू आघाडी युतीचे  सर्व उमेदवार विजयी...

जयसिंगपूर नगरपरिषदेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर  प्रचंड मतांनी विजयी...26 पैकी 21 यड्रावकर गटाचे उमेदवार विजयी तर  विरोधी आघाडीचे चार उमेदवार विजयी आणि  अपक्ष एक उमेदवार विजयी

हुपरी नगरपरिषद - भाजपला स्पष्ट बहुमत...
नगराध्यक्ष पदी भाजपचे  मंगलराव माळगे विजयी 
नगरसेवक पदाचे विजयी संख्याबळ 
भाजप - 18
मनसे - 02

पेठवडगाव नगरपालिका - नगराध्यक्ष पदी  यादव आघाडीच्या  विद्याताई पोळ विजयी... नगरसेवक पदी  यादव आघाडीचे 15 उमेदवार विजयी तर जनसुराज्यचे पाच उमेदवार विजयी 

कुरुंदवाड नगरपरिषदेत  शाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा डांगे विजयी 

गडहिंग्लज नगरपालिका -  नगराध्यक्ष पदी  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेश तुरबत मठ विजयी 

नगरसेवक पदाचे विजयी संख्याबळ 
राष्ट्रवादी अजित पवार गट -17 
जनता दल आणि मित्र पक्ष - 05