शहापूर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस...दोघे अल्पवयीन ताब्यात

<p>शहापूर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस...दोघे अल्पवयीन ताब्यात</p>

इचलकरंजी - शहर आणि शहापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. काही दिवसापूर्वी सावली सोसायटीत राहणाऱ्या महेंद्र यादव यांच्या घरातील सोन्या - चांदीची दागिने चोरटयांनी लंपास केले होते. याबाबत शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात अल्पवयीन मुले रात्रीच्या वेळी फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या संशयित दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी यादव यांच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले. 555 पोलिसांनी त्यांच्याकडून ८० हजार रूपये किमतीचे सोन्या - चांदीचे दागिने, तीन अँड्रॉइड मोबाईल, एक दुचाकी असा १ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.  या दोघांकडून आणखी गुन्हे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुंगसे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशी ढोने, ज्ञानेश्वर बांगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.