संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्यावतीने स्वच्छता अभियान
कोल्हापूर - संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त श्रमिक सेवा संस्था आणि हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्यावतीने उचगावमधील ज्ञान कला इंग्लिश मीडियम हायस्कूल परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
यावेळी शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच विद्यार्थिनींची आणि शिक्षकांची आरोग्य तपासणी करून त्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
यावेळी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या अध्यक्षा निर्मला कुऱ्हाडे, गिग वर्कस युनियनचे अध्यक्ष संतोष खटावकर, सेक्रेटरी सुमन शिंदे, सुजाता देसाई, मल्हार ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा सुरेश खोत आणि शाळेच्या प्राध्यापिका वैशाली निंबाळकर उपस्थित होत्या.