उज्ज्वला पुजारी यांना अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर 

<p>उज्ज्वला पुजारी यांना अहिल्यादेवी पुरस्कार जाहीर </p>

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी सांगलीच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे.  संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. वसंतराव जुगळे यांच्या ह्स्ते होणार आहे.


यावेळी उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जुगळे व संमेलनाध्यक्ष विनया खडपेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. माजी ग्रामीण विकासमंत्री अण्णासाहेब डांगे यांना  समाजभूषण पुरस्कार यांच्यासह दहा जणांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ः जीवन आणि कार्य या विषयावर परिसंवाद होईल तर दुपारी कवि धनंजय सोलणकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यावेळी आमदार रामहरी रूपनवर, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि एमएसईबीचे कार्यकारी संचालक मुरहरी केळ्ये करणार आहेत.