एक - दोन नव्हे तब्बल २०० संशयित बोगस मतदार ‘या’ ठिकाणी सापडले...

<p>एक - दोन नव्हे तब्बल २०० संशयित बोगस मतदार ‘या’ ठिकाणी सापडले...</p>

मुंबई – आज राज्यात शेवटच्या टप्प्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी मतदान होत आहे.  त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक - दोन नव्हे तब्बल २०० संशयित बोगस मतदार सापडल्याने खळबळ उडाली आहे. 
अंबरनाथ पश्चिममधील कोसगाव परिसरातून पोलिसांनी त्या  बोगस मतदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अंबरनाथ पश्चिममधील कोसगाव परिसरातील एका सभागृहात भिवंडीवरून आलेले सुमारे २०० नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. हे सर्वजण बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी या नागरिकांना जाब विचारला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने अंबरनाथ पोलिसांना पाचारण केले.त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.  पोलिसांनी या नागरिकांकडील आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा केले असून, त्यांची खरी ओळख पटवली जात आहे.