...अन् जोराच्या धडकेत 8 हत्तींचा जागीच मृत्यू

<p>...अन् जोराच्या धडकेत 8 हत्तींचा जागीच मृत्यू</p>

नवी दिल्ली – आसाममध्ये कळपातील 8 हत्तींचा  रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना शनिवारी मध्यरात्री 2 वाजून 17 मिनिटांनी घडली आहे. 
आसाम राज्यातील  होजाई जिल्ह्यामध्ये सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ट्रेनने  हत्तींच्या कळपाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कळपातील 8 हत्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. एक हत्ती गंभीररित्या जखमी झाला आहे.  या धडकेमुळे  ट्रेनचे  पाच डब्बे रुळावरुन खाली घसरले आहेत. तसेच अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.
 रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, या अपघातानंतर जमुनामुख कम्पूर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील सर्व रेल्वे सेवा या उत्तर प्रदेशच्या रेल्वे लाईनवरून वळवण्यात आल्या आहेत.