काँग्रेस समविचारी पक्षांसह शिव-शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढणार : शशांक बावचकर
इचलकरंजी - महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केलीय. यावर काँग्रेसचे शशांक बावचकर यांनी, महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मँचेस्टर आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आणि लाल निशाण पक्ष या सर्व मित्रपक्षांना एकत्र घेऊन शिव - शाहू विकास आघाडी स्थापन केल्याची घोषणा केलीय. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत शिव - शाहू विकास आघाडी महायुतीला वरचढ ठरेल असा दावाही केला आहे.
माजी नगरसेवक सागर चाळके यांनी, सर्वसामान्य जनतेचा कोणताही विचार न करता विद्यमान आमदार आणि सत्ताधारी कारभार करत असल्याची टीका केली. माजी आमदार राजीव आवळे यांनी, सत्ताधारी पक्षातील नेते केवळ मलई खाण्याचे काम करतायत, असा आरोप केला. माजी आमदार राजू बाबा आवळे यांनी, आघाडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश मोरबाळे, मदन कारंडे यांच्यासह आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.