महायुतीच्या विजयासाठी सज्ज व्हा : आ. राजेश क्षीरसागर आवाहन

<p>महायुतीच्या विजयासाठी सज्ज व्हा : आ. राजेश क्षीरसागर आवाहन</p>

कोल्हापूर - सरकारच्या योजना आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवून महायुतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आजच्या  शिवसेना शिंदे गटाचा मेळाव्यात केले.

आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक विनायक साळोखे यांनी मनोगतं व्यक्त करताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात घालून काम करा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या दोन - तीन वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत अनेक विकास कामे मार्गी लावल्याचे  सांगितले. यावेळी शिवाजी पेठेतील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कुपटे यांच्यासह अन्य महिलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी नंदकुमार मोरे, अजित इंगवले, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, शिवाजीराव जाधव, रणजीत जाधव, कृष्णा लोंढे, सौरभ कुलकर्णी, मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.