वाडीरत्नागिरी ग्रामपंचायतीला घरफाळा सवलतीचा शासन निर्णय लागू करा : मनसेची मागणी
कोल्हापूर – वाडीरत्नागिरी, दाणेवाडी ग्रामपंचायतीला घरफाळा सवलतीचा शासन निर्णय तात्काळ लागू करा, अशी मागणी पन्हाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी प्रशासक, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करून सदरचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी मनसेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष लखन लादे, उपाध्यक्ष नयन गायकवाड, तुषार चिकुरडेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील , संतोष पवार, राहुल मिटके उपस्थित होते.